Header

Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार

Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार

Modi Government | Modi government will bring a new co-operation policy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | सहकार क्षेत्राला अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच मोदी सरकार (Modi Government) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पुढाकारातच नवे सहकार धोरण आणणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (central cooperative minister amit shah) यांनी सांगितले.

देशातील पहिले राष्ट्रीय सहकार संमेलन शनिवारी पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थांच्या २,१०० प्रतिनिधींची उपस्थिती होती. अमित शहा म्हणाले, देशातील प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षात ६५ हजार सोसायट्यांची संख्या वाढवून तीन लाखापर्यंत करण्यात येणार आहे. सहकारासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स, नॅशनल डाटा बेस आणि राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. राज्याच्या अखत्यारीत सहकार हा विषय आहे तरीही या वर्षी जुलैमध्ये केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी (Modi Government) स्पष्ट केले.

केंद्र आणि राज्याच्या वादात मी पडू इच्छित नाही. याचे कायदेशीर उत्तर दिले जाऊ शकते. राज्यांना केंद्र सरकार सहकार्य करील कोणत्याही प्रकारे संघर्ष होणार नाही अशी ग्वाही शहा यांनी यावेळी दिली.

Web Title : Modi Government | Modi government will bring a new co-operation policy

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Loan Management TIPS | कर्जाच्या ओझ्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा मॅनेजमेंट; कर्ज फेडताना होणार नाही त्रास

The post Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article