Header

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

driving licence new rules 2021 driving license new rules 2021 no need go rto now organization will also issue driving license

बहुजननामा ऑनलाईन – Driving Licence New Rules 2021 | ड्रायव्हिंग लायसन बनविण्यासाठी आरटीओ कार्यालयात खेटे मारावे लागत होते. त्यातच एजंटगिरीने तर चक्रावून सोडले होते. पैशाचीही मागणी होत होती. तसेच आरटीओच्या ट्रॅकवर चाचणी द्यावी लागत होती. त्यासाठी नंबर येण्यासाठीही या एजंटांची खाबुगिरी चालायची. यामुळे नागरिकांना सर्व कागदपत्रे असून देखील मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र ही सर्व दगदग आता कमी होणार आहे. कारण महिनाभरापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने एक नोटीस काढली आहे. त्यानुसार काही संस्थादेखील तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढून देऊ शकणार आहेत. आरटीओ मध्ये देखील लायसन मिळेल परंतू तेथील व्याप कमी करण्यात येणार (Driving Licence New Rules 2021) आहे.

या नवीन नियमानुसार वैध संस्था, कंपन्या, एनजीओ, ऑटोमोबाईल असोसिएशन, वाहन निर्माता संघ, वाहन निर्माता चालक प्रशिक्षण केंद्र (डीटीसी) यांना लायसन देण्याची मान्यता देणात येणार आहे. त्यासाठी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संस्थांसाठी काही निर्देशही देण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ नुसार अर्ज करणाऱ्या संस्थांकडे आवश्यक जमीन आणि आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या स्थापने नंबर स्वच्छ रेकॉर्ड असायला हवे.
या जमीनीवर ट्रॅक बांधावा लागणार आहे. (Driving Licence New Rules 2021)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वाढत्या अपघातांमुळे केंद्र सरकारने २०१९ मध्ये लोकांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळावेत यासाठी नवीन कायदे केले आहेत. त्यामध्ये जबर शिक्षा आणि १० ते १०० पटींनी दंडही वाढवला आहे. दरम्यान या नवीन कायद्याची अंमलबजावणी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली आदी राज्यांत लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अद्याप हे नियम लागू करण्यात आलेले नाहीत.

कोरोना काळानंतर देशातील सरकारी यंत्रणांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
सर्व आरटीओ कार्यालयातील कार्यपद्धतीतही बदल केले असून लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याच्या प्रक्रियाही बदलली आहे. नवीन प्रणालीनुसार स्लॉट बुक होतात आणि लर्निंग लायसनसाठी पैसे जमा करावे लागत आहेत. परीक्षेसाठी तारीख देखील पैसे जमा केल्यानंतर तुम्ही तुमच्या सुविधेनुसार निवडू शकता.

 

 

web title: Driving licence new rules 2021 driving license new rules 2021 no need go rto now organization will also issue driving license.

 

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

Parenting | चुकूनही मुलांना बोलू नका ‘या’ 5 गोष्टी, भारतीय पालक करतात ‘या’ चूका ज्या पडतात महागात; जाणून घ्या

The post Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article