Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ते सख्ये बहिण भाऊ असून वडिलांच्या संपत्तीवरुन त्यांच्या वाद निर्माण झाला. त्यातून भावाने बहिणीच्या घरी जाऊन तिला पेटविल्याची घटना औंधमध्ये (Aundh) शनिवारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) भावाला अटक (Pune Crime) केली आहे.
शाम मनोहर पतंगे Shyam Manohar Patange (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्या ४५ वर्षाच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने सख्ये भाऊ बहिण आहेत. वडिलांच्या संपत्तीवरुन दोघांमध्ये वाद आहेत. फिर्यादी या औंधमधील घरी असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाम पतंगे त्यांच्या घरी दारु पिऊन आला. त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादी या स्वयंपाक घरामध्ये खुर्चीवर बसून आराम करीत असताना शाम याने त्याच्याकडील माचिसच्या काडीने फिर्यादी यांना आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी यांची हनुवटी, दोन्ही गाल तसेच मानेपासून खाली पायापर्यंतचा सर्व भाग भाजलेला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शाम पतंगे याला अटक केली आहे.
Web Title : Pune Crime |elder sister was set on fire for ancestral property In Aundh, Pune
Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार
Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’
The post Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले appeared first on बहुजननामा.