Header

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

pune crime beating of father in law to pay for his wifes childbirth shocking incident in pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ होताना दिसतो. तसेच पहिले बाळंतपण हे साधारणपणे माहेरी करण्याची आपल्याकडे पुर्वांपारापासून पद्धत आहे. पण इंदापूर तालुक्यात पत्नीच्या बाळंतपण व गायीचे पैसे दे म्हणून जावयाला मारहाण (Pune Crime) करण्याचा प्रकार समोर आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याप्रकरणी सोमनाथ शंकर शिंदे (वय २८, रा. पिंपरी ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोमनाथ शंकर काळेल, भोजु सोमनाथ काळेल, अक्षय सुनिल काळेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदापूर जिल्ह्यातील कौठळी गावात शुक्रवारी सकाळी घडली.

सोमनाथ शिंदे हे मजुरी काम करतात. त्यांची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावात आली आहे. पत्नी व बाळाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी ते सासुरवाडीला आले होते. त्यावेळी त्यांना सासरे व मेव्हण्यांनी पत्नीच्या बाळंतपणाचा व गायीचे असे एकूण १७ हजार रुपये आणून दे, असे सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद झाल्यावर आरोपींनी सोमनाथ शिंदे यांच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. पोलीस निरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.

Web Titel : pune crime beating of father in law to pay for his wifes childbirth shocking incident in pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

PM Kisan चा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतो पेन्शनचा लाभ, ‘या’ स्कीम अंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

The post Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article