Header

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

smriti mandhana smriti mandhana becomes the first india women cricketer to score a century in pink ball test match india vs australia

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  Smriti Mandhana | भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) मध्ये होत असलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने शानदार शतक ठोकले. हे स्मृतीच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक आहे. तिने हे शतक 170 चेंडूत 18 चौकार आणि एक षटकार मारून केले. स्मृतीने एलिसे पॅरीच्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

विराट कोहली (Virat Kohli) नंतर भारताकडून गुलाबी चेंडू कसोटीमध्ये शतक करणारी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुसरी क्रिकेटर ठरली आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीमध्ये बांगलादेशविरूद्ध 136 धावांची खेळी केली होती.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्मृतीने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 51 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. तिने चार चौकार तर एकाच षटकात डार्सी ब्राऊनच्या चेंडूवर फटकावले. स्मृती मंधानाने पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मासोबत 93 धावा केल्या होत्या. शेफाली 31 च्या धावसंख्येवर सोफी मोलिनूच्या चेंडूवर ताहलिया मॅक्ग्राकडून झेलबाद झाली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

केवळ चौथ्या कसोटी सामन्यात केले पहिले शतक

अवघ्या 18 व्या वर्षी पदार्पण करणार्‍या स्मृती मंधानाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा अर्धशतक केले होते. तिने ही कामगिरी 2014 मध्ये इंग्लंडविरूद्ध केली होती.

या कसोटीनंतर 7 वर्षानंतर भारतीय महिला टीमने इंग्लंडमध्ये लाल चेंडूने क्रिकेट खेळले होते. हा सामना तीन महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या ब्रिस्टल मैदानावर खेळवण्यात आला, ज्यामध्ये स्मृतीने शानदार 78 धावांची खेळी केली होती.
हा सामना अनिर्णित राहिला होता.

 

web title: Smriti mandhana smriti mandhana becomes the first india women cricketer to score a century in pink ball test match india vs australia.

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

The post Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article