Header

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

IMD | 1st december 2021 heavy rain likely in palghar Thane and mumbai today odisha and gujarat

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी उत्तर गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD च्या अंदाजानुसार पालघर (Palghar), ठाणे (Thane) आणि मुंबईला (Mumbai Rains) मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. शनिवारी सकाळी एक चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरही धडकू शकते.

IMD ने मंगळवारी सांगितले की, शनिवारी सकाळी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, थायलंड आणि आसपासच्या भागात सकाळी 8.30 वाजता कमी दाबाचे क्षेत्र कायम होते. येत्या 12 तासांत ते अंदमान समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून आग्नेय आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात 2 डिसेंबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत मध्य बंगालच्या उपसागरात ते चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे.

5 ते 6 डिसेंबरला पूर्वेकडील राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो
IMD ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील वेगवेगळ्या ठिकाणी ’मुसळधार ते अति मुसळधार पाऊस’ आणि ओडिशाच्या लगतच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये, पश्चिम बंगालचे किनारी जिल्हे आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात ’मुसळधार ते अति मुसळधार’ पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. IMD ने म्हटले आहे की, ‘इशान्येकडील राज्यांमध्ये 5-6 डिसेंबर रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.‘

ओडिशातील कमी दाबाच्या क्षेत्राची हालचाल आणि त्याचा परिणाम याविषयी माहिती देताना IMD DG मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ‘4 डिसेंबरच्या सकाळी ते ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनार्‍याजवळ असले तरी ते लगेच किनार्‍यावर धडकणार नाही.‘ ते हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने सरकणार आहे.

कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर झाल्यानंतरच पावसाची हालचाल, वार्‍याचा वेग आणि भूस्खलनबाबत चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की शुक्रवारपासून ओडिशा किनारपट्टीवर वार्‍याचा वेग 40-50 किमी प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याचा वेग हळूहळू वाढेल. चक्रीवादळादरम्यान तो सुमारे 60-90 किमी प्रतितास वेगाने राहण्याची शक्यता आहे.

Web Title :- IMD | 1st december 2021 heavy rain likely in palghar Thane and mumbai today odisha and gujarat

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

The post IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article