Header

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

LPG Price | lpg price became costlier by rs 100 a setback to the expectations of gas cylinder becoming cheaper

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. गॅस सिलेंडर आजपासून 100 रुपये महाग झाला आहे. लोकांना अपेक्षा होती की, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार (Modi Government) पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅससुद्धा स्वस्त करेल. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की, ही वाढ कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली आहे. (LPG Price)

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी ही वाढ कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत केली (LPG Price) आहे. मागील महिन्यात हा सिलेंडर 266 रुपयांनी महागला होता आणि आता यामध्ये 100 रुपयांची वाढ केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कमर्शियल सिलेंडरचे दर
आजसुद्धा दिल्लीत कमर्शियल सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी हा 1733 रुपयांचा होता. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांचा झाला आहे. तर कोलकातामध्ये 19 किलोचा इण्डेन गॅस सिलेंडर 2174.50 रुपये झाला आहे. चेन्न्ईमध्ये आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी 2234 रुपये खर्च करावे लागतील.

घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना दिलासा
दिल्लीत 14.2 किलोचा विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 899.50 रुपयांना मिळत आहे. आज यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. 6 ऑक्टोबरला यामध्ये वाढ झाली होती. (LPG Price)

तारीख – 1 डिसेंबर 2021 (14.2 किलोचा विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर)
– दिल्ली – 899.5

– मुंबई – 899.5

– कोलकाता – 926

– चेन्नई – 915.5

Web Title :- LPG Price | lpg price became costlier by rs 100 a setback to the expectations of gas cylinder becoming cheaper

Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

The post LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article