Header

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

Pune Crime | torture and molestation minor girl kondhwa pune 10 years rigorous imprisonment to Ashpak Salim Bagwan

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून बहिणीच्या घरी नेत अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 68 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुणे सत्र न्यायालयाचे (Pune Sessions Court) न्यायाधीश के.पी. नांदेडकर (Judge K.P. Nandedkar) यांनी हा निकाल दिला. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घडला होता.

अश्पाक सलीम बागवान Ashpak Salim Bagwan (वय-28 रा. मिठानगर, कोंढवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जून 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी अश्पाक हा तिचा पाठलाग करीत होता. घटनेच्या दिवशी त्याने तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला अवडतेस. मला तुला काही सांगायचे आहे’ असे तिला सांगितले. (Pune Crime)

त्यानंतर पीडित मुलीला त्याच्या बहिणीच्या घरी नले व त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. ही बाब कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपीने पीडित मुलाला वेळोवेळी त्रास देऊ लागल्याने मुलीच्या आईने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे (Public Prosecutor Sunil Hande)
आणि अ‍ॅड. मिलिंद दातरंगे (Adv. Milind Datarange) यांनी पाहिले. पोलीस हवालदार महेश जगताप (Police Constable Mahesh Jagtap) आणि पोलीस नाईक अंकुश केंगले (Police Naik Ankush Kengle) यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंडाच्या रकमेपैकी 35 हजार रुपये मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. दंडाची रक्कम न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे निकालात नमूद केले आहे.

Web Title :- Pune Crime | torture and molestation minor girl kondhwa pune 10 years rigorous imprisonment to Ashpak Salim Bagwan

Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट

LPG Cylinder Price | नव्या वर्षापासून वाढतील एलपीजी सिलेंडरचे दर ! डिजिटल पेमेंटमध्ये सुद्धा होईल मोठा बदल, जाणून घ्या

Gold Price Today | खुशखबर ! स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर

The post Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article