Header

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

Maharashtra Monsoon Update | imd monsoon update rain across maharashtra state kokan pachhim maharashtra 5 days

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा होती. तो पाऊस आता सक्रिय झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून काही जिल्ह्यात (Maharashtra Monsoon Update) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. मंगळवारी रात्री मुंबईसह (Mumbai) राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात मुसळधार पाऊस कोसळला असला तरी आता राज्यात पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

राज्यातील काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली आहे. दरम्यान काही ठिकाणी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आता पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, कूचबिहार, अलीपुरद्वार आणि सिक्कीम या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दक्षिण आणि नैऋत्य वाऱ्यांच्या परिणामामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | imd monsoon update rain across maharashtra state kokan pachhim maharashtra 5 days

 

हे देखील वाचा :

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस देत आहे जबरदस्त संधी, केवळ 417 रुपये जमा करून बनू शकता करोडपती

 

The post Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article