Header

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच

नाशिक :  बहुजननामा ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिकमधील आदिवासी विभागातील (Tribal Division) अधिकाऱ्यांमध्ये सध्या काय चाललंय, असा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयात एका बड्या अधिकाऱ्याला 28 लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीने रंगेहात पकडले. त्यानंतर नाशिक आदिवासी विकास भवनात (Nashik Tribal Development Bhawan) आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना नाशिक लुचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) पकडले आहे. या अधिकाऱ्याने चक्क टॉयलेटमध्ये लाच घेतली. विशेष म्हणजे पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडले.

 

आदिवासी विभागातील लाचखोर (Bribe) कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल (Executive Engineer Dinesh Kumar Bagul) यांना 28 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल (Central Kitchen Bill) मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात आले. प्रताप वडजे (Pratap Vadje) असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. वडजे हा आदिवासी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) पदावर कार्य़रत आहे. रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यात वडजे याने लाच मागितली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तक्रारदाराच्या पत्नीचे रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते.
कामाठी किंवा स्वयंपाकी असं नव्याने आदेश बदलून देण्याची विनंती केली होती.
या कामाच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची मागणी वडजे याने केली होती.
तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) तक्रार केली.
पथकाने सोमवारी (दि.29) वडजे याने पैसे घेऊन बोलावले आणि टॉयलेटमध्ये त्याने 10 हजार रुपये लाच स्विकारले.
पण त्यापूर्वीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.
वडजे याला 10 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Nashik | an officer was caught while accepting a bribe of 10 thousand rupees in the toilet an incident in nashik

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

CM Eknath Shinde | राज्यात पोलीस आणि अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार

Pune Crime | ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेच्या 13 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार; नारायण पेठेतील सूर्यसेन पवारविरूध्द गुन्हा

 

The post Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article