Header

Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक

Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन अभिनेता निर्माता कमाल रशीद खान (Kamal Khan) याला मालाड पोलिसांनी (Malad Police) आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) उतरल्यानंतर ताब्यात घेत अटक (Arrest) केली. केआरके म्हणून ओळखल्या जाणार्‍या कमाल खान (Kamal Khan) याने २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटबद्दल पोलिसांनी ही कारवाई केली. त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

खान (Kamal Khan) सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर अनेक सेलिब्रिटींना टार्गेट करत होता, सेलिब्रिटींमध्ये ज्येष्ठ अभिनेते तसेच नवोदित कलाकारांचाही समावेश होता. त्याच्या ट्विटमधील भाषा ज्येष्ठ कलाकारांसाठीही आक्षेपार्ह होती. त्याचे ट्विट माझ्या लक्षात आले होते, त्यानंतर मी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज त्याला अटक केली, असे राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

२०२० मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Actor Rishi Kapoor) आणि इरफान खान (Actor Irrfan Khan) यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या अपमानास्पद ट्विटबद्दल युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कनाल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. खान (Kamal Khan) ने ३० एप्रिल रोजी ट्विटरवर ऋषी कपूर यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची घोषणा केली आणि सांगितले की, वाइन शॉप लवकरच सुरू होणार असल्याने अभिनेत्याचा मृत्यू होऊ नये, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच २९ एप्रिल रोजी त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याने इरफान खानबाबत देखील अपमानास्पद वक्तव्य केले होते.
आम्ही कमाल आर खान यांच्याविरुद्ध कलम २९४ (सार्वजनिकपणे अश्लील कृत्ये किंवा शब्दांसाठी शिक्षा)
आणि भारतीय दंड विधान संहितेच्या इतर तरतुदींनुसार दोन्ही मृत अभिनेत्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल
गुन्हा नोंदवला असुन अधिक तपास सुरू आहे असे पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले.

 

Web Title :- Kamal Khan | Kamal Khan was arrested from the airport in connection with the controversial tweet

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच

Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

CM Eknath Shinde | राज्यात पोलीस आणि अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार

 

The post Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article