Mumbai Police | नौदल आणि सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – नौदल (Navy) आणि सीआयएसएफच्या (CISF) जवानांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्याला (Mumbai Police) मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नौदलाच्या दोन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) दोन अशा चौघांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना मुंबईतील कफ परेडमध्ये (Cuffe Parade) घडली आहे. हे चारही आरोपी मुंबईत फिरण्यासाठी आले होते.
मुंबईमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून कफ परडेमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईतील कफ परेड परिसरात फिरण्यासाठी आले होते.
त्यांनी दुपारचे जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी टॅक्सी बुक केली होती.
टॅक्सी काही अंतरावर गेल्यानंतर एकाने टॅक्सीत सिगारेट पेटवली. याला टॅक्सी चालकाने विरोध केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपींनी टॅक्सी चालकासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सिगारेट वरुन टॅक्सी चालक आणि आरोपी यांच्यात जोरदार वाद झाला.
याच वादातून हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) एक पोलीस अधीकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करु लागले.
पोलिसांनी मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली.
यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सुरक्षा दलात कार्यरत असल्याचे समोर आले.
आरोपींपैकी दोन आरोपी हे भारतीय नौदलात तर दोन आरोपी हे सीआयएसएफ मध्ये कार्यरत आहेत.
सुरक्षा दलात असलेल्या जवानांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे.
Web Title :- Mumbai Police | mumbai police officer beaten by four accused who worked in navy and cisf mumbai police arrested four of them
हे देखील वाचा :
Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय
Pune Crime | विमाननगर परिसरात जबरदस्तीने हप्ता वसुली करणार्या टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा
The post Mumbai Police | नौदल आणि सीआयएसएफच्या जवानांकडून मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला मारहाण appeared first on बहुजननामा.