Header

Akola Murder News | शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या! भर चौकात केले सपासप वार, हल्लेखोर फरार

Akola Murder News | शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या! भर चौकात केले सपासप वार, हल्लेखोर फरार

अकोला : बहुजननामा ऑनलाईन – Akola Murder News | शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचा भरचौकात धारदार हत्याराने भोसकून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना अकोला शहरात (Akola Crime News) घडली आहे. खून झालेल्या उपशहर प्रमुखाचे नाव विशाल कपले (Vishal Kaple) आहे. शहरातील जठारपेठ चौक या गजबजलेल्या ठिकाणी संध्याकाळी हल्लेखोरांनी हे कृत्य केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कपाले यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले पण तिथे त्यांचा मृत्यू (Akola Murder News) झाला. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिवसेना (Shivsena) अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले हे त्यांच्या स्कूटीवरुन जात असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून जठार चौकात गाठले आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात 33 वर्षीय विशास कपले हे गंभीररीत्या जखमी होऊन खाली कोसळले. कपले हे मूळचे मोठी उमरी येथील रहिवासी आहेत. या खुनाच्या घटनेनंतर अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

तीन ते चार युवकांनी शहरातील महाकाली माता मंदिरापासून विशाल कपले यांचा पाठलाग केला आणि जठारपेठ
येथील कोरडे हॉस्पिटल (Korde Hospital) येथील गल्लीत वळताच कपले यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला
करण्यात आला, असे सांगण्यात येत आहे. अकोला शहरातल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये (Icon Hospital) उपचार सुरु असतानाच कपले यांचा मृत्यू झाला.

 

पोलिसांनी खूनप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.
शिवसेना अकोला उपशहर प्रमुखाची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की, वैयक्तिक वैमनस्यातून झाली
की इतर कारणावरून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांपुढे या घटनेमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Akola Murder News | akola murder news thackeray group akola upshahar chief vishal kaple killed after stabbing by unknown attackers with knife

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | भाजपच्या ‘या’ आमदारानी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा, म्हणाले – ‘प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, घरी…’

Gas Cylinder | डिलीवरी बॉय यापुढे OTP दिल्याशिवाय गॅस सिलिंडर नाही देणार

Pune Crime | पती पत्नीच्या वादात समजाविण्याचा प्रयत्न करणार्‍या लहान भावावर कोयत्याने वार

 

The post Akola Murder News | शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या! भर चौकात केले सपासप वार, हल्लेखोर फरार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article