Header

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात (Abortion) केला. त्यानंतर अनुसुचित जातीच्या असल्याने लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२४९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मिलिंद बाळासाहेब भोईटे Milind Balasaheb Bhoite (वय ३३, रा. पवारवाडी, श्रीगोंदा) व एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ दरम्यान बाणेर, हडपसर येथील लॉजवर घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसरमध्ये (Hadapsar, Pune) रहात असून
आरोपीच्या ओळखीच्या आहेत. आरोपीने फिर्यादी या अनुसुचित जातीच्या आहेत हे माहिती असताना त्यांना
लग्नाचे आमिष दाखविले. त्यांना वेगवेगळ्या लॉजवर नेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले.
त्यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्यावर त्यांना गोळ्या देऊन त्यांचा गर्भपात केला.
तसेच फिर्यादीचे लॉजवरील नग्न अवस्थेतील फोटो (Nude Photo) काढून ते रविना नावाच्या महिलेला पाठविले.
ते फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन शरीर संबंध (Physical Relationship) ठेवण्यास भाग
पाडले. फिर्यादी या अनुसुचित जातीच्या आहेत, म्हणून लग्नास करण्यास नकार देऊन रविना हिने आरोपीला
चिथावणी देऊन फिर्यादीला शिवीगाळ केली.
आपली फसवणुक (Fraud Case) झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली असून
सहायक पोलीस आयुक्त देसाई (Assistant Commissioner of Police Desai) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Abortion induced by rape by luring marriage; A case has been registered against the youth under the Atrocities Act along with rape

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही, एकनाथ खडसे म्हणाले – अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच… माझ्यासोबत…

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

Nashik ACB Trap | वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करुन देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपिकावर एसीबीकडून FIR

 

The post Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article