Header

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन सुरु असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. यावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे. यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये वादविवाद होताना पहायला मिळत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर (Shinde Group) टीका केली आहे. या 40 आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, अशा शब्दात अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीकास्त्र सोडले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

राज्यात विद्यमान परिस्थितीत खोटेगिरी सुरु असून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारने (State Government) घोषणा केलेला आनंद शिधा अद्याप मिळतोय, निदान तुळशीच्या लग्नापर्यंत मिळावा अशी अपेक्षा अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी व्यक्त केली. तसेच या 40 आमदारांना गाडण्यासाठी लोक वाट पाहत आहेत, महाराष्ट्रातील जेव्हा निवडणुका होतील तेव्हा महाराष्ट्राची जनता या लोकांना आपली घर दाखवतील, अशा शब्दात सावंत यांनी 40 आमदारांवर टीकास्त्र सोडले.

 

निवडणूक संदर्भात न्यायालयीन लढाई सुरु असून 29 तारखेला काय होते ते पाहुयात. संतोष गावडे नावाच्या मुलाने 31 ऑक्टोबरला पत्र लिहिले आणि 31 ऑक्टोबर रोजीच या पत्राचे उत्तर आरटीआयच्या माध्यमातून आले आहे.
म्हणजे, ड्राफ्ट रेडीच होता. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी
ज्या पद्धतीने टाईमलाईन देऊन सत्ताधाऱ्यांची चिरफाड केली आहे, हिंमत असेल तर समोरासमोर या आणि बोला,
असे आव्हानही सावंत यांनी सरकारला दिले आहे.

 

 

Web Title :-  MP Arvind Sawant | people can wait to bury 40 mlas arvind sawant on shinde group mla

 

हे देखील वाचा :

Kushal Badrike | कुशलच्या इंस्टाग्राम पोस्टखाली चाहत्याने एक खंत व्यक्त केली ; नक्की असं का म्हणालाय हा चाहता पाहा

Pune Crime | दहा महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न, अनैतिक संबंधातून पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह चौघांना अटक; पुणे जिल्ह्यातील घटना

Chandrakant Patil | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

The post MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article