Header

Navneet Rana | फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही; नवनीत राणांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…

Navneet Rana | फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही; नवनीत राणांचे संजय राऊतांवर टीकास्त्र…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सध्या नागपूरात सुरू असून विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अधिवेशनाच्या मुद्यावर अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडण्यात येणार असल्याबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊतांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणांनी (Navneet Rana) संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच कोणता बॉम्ब कोण फोडणार, यात विदर्भातील लोकांना रस नाही, असे देखील नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या पत्रकारांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. राणा म्हणाल्या, ‘अडीच वर्षात एकाही प्रकल्पाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केल्याचे आठवत नसेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनतेला विकासकामे हवी आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा नाही. विधानसभेच्या प्रत्येक मिनीटासाठी महाराष्ट्रातील नागरिक पैसे भरतात. त्यामुळे विधानसभेत जनतेच्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजे.’ असे नवनीत राणा यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

 

तसेच, ‘कोण कोणता बॉम्ब फोडेल, यात विदर्भातील लोकांना रस नाही. अडीच वर्षात काय कामे केली याची दहा नावे सांगावित. पण, काम करत असताना प्रत्येक व्यक्तीकडून चुक होते. जर ते बाहेर काढण्यास सुरूवात केली तर, यांना जड जाईल. मात्र, देवेंद्र फडणवीसांना फटाके फोडण्यात अजिबात रस नाही.’ असे देखील नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

 

तसेच नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी देखील शिवसेना ठाकरे गटावर टीका केली यात त्यांनी
शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला.
ते म्हणाले, “संजय राऊत यांच्या पक्षातले ४० आमदार बाळासाहेबांचे विचार घेऊन भाजपसोबत गेले आहेत.
हा बॉम्ब आधिच फुटला आहे. आणि आता जो बॉम्ब फुटेल त्यात कदाचित आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे
जेलमध्ये जातील. तसेच जर देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठे पळायचं आणि कुठे
लपायचं सुचणार नाही. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा ही विदर्भात आणि नागपूरमध्ये करू नये.”

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Navneet Rana | navneet rana reply sanjay raut political bomb statement

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात म्हणूनच असे लोक सरकारमध्ये आहेत; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल…

Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर, मात्र उद्धव ठाकरेंची ‘ती’ मागणी नाकारली

Himanshi Khurana | परदेशात शूटिंग करताना ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात करण्यात आले दाखल

 

The post Navneet Rana | फडणवीसांनी बॉम्ब फोडला तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही; नवनीत राणांचे संजय राऊतांवर टीकास्त्र… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article