Header

Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार

Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Mumbai Minor Girl Gang Rape Case | लोअर परळमध्ये मुंबईला हादरवून सोडणारी घटना घडली. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 6 मुलांनी बलात्कार (Mumbai Crime) केला आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. शुक्रवारी या मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला. यातील धक्कादाय प्रकार म्हणजे तीन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेतले असून, अल्पवयीन तीनही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी लोअर परळमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहीक बलात्कार करण्यात आला. आरोपींमधील एक अल्पवयीन मुलगा या पीडितेचा मित्र आहे. पीडितेला घेऊन तो आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. (Mumbai Minor Girl Gang Rape Case)

 

तरुणीने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पालकांनी एस एम जोशी पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पिडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे सहा आरोपींना ताब्यात घेतले. यातील तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तर इतर तिघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून पुरावे गोळा केले जात आहेत.

 

 

Web Title :- Mumbai Minor Girl Gang Rape Case | gang rape on 15 year old girl in lower parel mumbai

 

 

हे देखील वाचा :

Pune News | सर्व्हर स्लो चालत असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास; रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Pune Crime | खेड शिवापूर येथील पेट्रोल पंपावर दरोडा

Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

 

The post Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article