Header

Nashik Crime | मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापलेकांची आत्महत्या; नाशिकमधील घटना

Nashik Crime | मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापलेकांची आत्महत्या; नाशिकमधील घटना

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन  Nashik Crime | राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी वेगवेगळ्या खोलीत जाऊन आत्महत्या (Suicide) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Crime)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूरमधील राधाकृष्ण नगर परिसरात काल एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परीसरात मोठी खळबळ उडाली. दीपक शिरोडे (वडील), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25 ), राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. बाप आणि दोन मुलांनी एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत जाऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे या तिघांनी हे पाऊल उचलले आहे. (Nashik Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराने येथील आहे. मागच्या १० वर्षांपासून ते व्यवसायानिमित्ताने नाशिकला आले होते. दीपक शिरोडे यांचा अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय आहे. तर त्यांचा मुलगा प्रसाद यांची पत्नी गर्भवती होती. त्यामुळे ती मुंबईला गेली होती. तिने कालच एका गोंडस मुलीला जन्म दिला. यादरम्यान वडील दीपक शिरोडे, मोठा मुलगा प्रसाद शिरोडे आणि छोटा मुलगा राकेश शिरोडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक यांचा अशोक नगरच्या शेवटच्या बस स्टॉपवर फळ विक्रीचा धंदा होता. प्रसाद आणि राकेश हे दोघे शिवाजी नगरात गाडीवरून फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्यावर कर्जाचे मोठे ओझे होते. याच कारणातून या तिघांनी आत्महत्या केली आहे. या तिघांनी आत्महत्या करण्याअगोदर एक नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Nashik Crime | father and his two son took big decision and killed himself in nashik

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Prisoners Release | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 189 बंद्यांची सुटका

The post Nashik Crime | मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापलेकांची आत्महत्या; नाशिकमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article