Chitra Wagh | ‘भीम आर्मी’ची भाजपनेत्या चित्रा वाघ यांना धमकी; म्हणाले…
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील एका हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची स्तुती करत एक विधान केले. त्यांच्या या विधानावर भीम आर्मीने (Bhim Army) आक्षेप घेतला आहे. तसचं यावेळी भीम आर्मीने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. आता भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील शाईफेक करणार असल्याची धमकी भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. पुण्यातील हळदी-कुंकू कार्यक्रमात चित्रा वाघ आणि चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांची स्तुती करत चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘घराघरात सावित्री (Savitribai Phule) झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा (Jyotiba Phule) शोध आहे.’ त्यांच्या याच वक्तव्यावर भीम आर्मीकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या वक्तव्यावर बोलताना भीम आर्मीचे अशोक कांबळे (Ashok Kamble) म्हणाले, ‘चित्रा वाघ तूमचं डोकं फिरलंय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा ज्योतिबा फुलेंची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अवमान केला आहे . महाराष्ट्राचा, देशाचा अवमान केला आहे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुमच्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध आहे. भीम आर्मी च्या महिला ब्रिगेड तुमचा शाईने सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लवकरच करतील.’ असा धमकीवजा इशारा यावेळी बोलताना अशोक कांबळे यांनी चित्रा वाघ यांना दिला.
हळदी-कुंकू कार्यक्रमादरम्यान नक्की काय म्हणाल्या चित्रा वाघ :
‘काही मिनिटांपूर्वी दादा (चंद्रकांत पाटील) खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले.
म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे.
पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत.
मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे.
असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते.’ असं भाजपनेत्या चित्रा वाघ यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chitra Wagh | bhim army threatened to throw ink on chitra wagh face
हे देखील वाचा :
Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा
Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी
Eknath Khadse | ‘…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर’ एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
The post Chitra Wagh | ‘भीम आर्मी’ची भाजपनेत्या चित्रा वाघ यांना धमकी; म्हणाले… appeared first on बहुजननामा.