Header

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक (Pune Kasba Bypoll Election) जाहीर केली आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी कसबा मतदारसंघाची (Kasba Constituency) पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी होत असली तरी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस (Congress) कसबा पोटनिवडणूक (Pune Kasba Bypoll Election) लढवण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena of Uddhav Balasaheb Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रविवारी (दि.29) पुण्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कसबा पोटनिवडणूकीबाबत (Pune Kasba Bypoll Election) चर्चा झाली. ही निवडणूक शिवसेनेने लढवावी आणि शहराध्यक्ष संजय मोरे (City President Sanjay More) यांना उमेदवारी द्यावी, असा एकमुखी सुरू उमटला. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीचा निरोप घेऊन संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

तर दुसरीकडे काँग्रेस पोटनिवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेने का लढवू नये? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे कसबा पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान, कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसने ही जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसचे इच्छूक उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी महापालिकेकडे Pune Muncipal Corporation (PMC) ना हरकत प्रमाणपत्र No Objection Certificate (NOC) मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे. यातच आता शिवसेनेने ही जागा लढवण्याची तयारी सुरु केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कसबा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असताना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मात्र चिंचवडमधून (Pune Chinchwad Bypoll Election) शिवसेनेला उमेदवारी मिळावी, असे म्हटले आहे. शिवसेनेची चिंचवड मतदारसंघात ताकद जास्त असल्याचे गणित मांडत कसब्यातून नाही तर चिंचवडमधून उमेदवारी मिळावी, असे राऊत यांनी म्हटले आहे.
त्यामुळे कसब्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कमलाची अस्वस्थ झाले आहेत.
त्यानंतर बैठक घेऊन पुण्यातील शिवसैनिकांनी कसब्यात निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निरोप पक्षप्रमुखांना पाठवला आहे.
यावर आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Pune Kasba Bypoll Election | shivsena sanjay more intrested for contest kasaba vidhansabha bypoll election

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | घरात शिरुन टोळक्याने फोन पे वरुन पैसे घेऊन कार नेली पळवून

Pune Crime News | पैसे मागितल्याने दोघा गुंडाचा पाणीपुरी चालकावर चाकू हल्ला

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

 

The post Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article