Header

Radhakrishna Vikhe-Patil | ‘घरोबा एकाबरोबर करायचा अन् संसार दुसऱ्याबरोबर करायचा;’ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र

Radhakrishna Vikhe-Patil | ‘घरोबा एकाबरोबर करायचा अन् संसार दुसऱ्याबरोबर करायचा;’ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन  पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करण्यासाठी आले असता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी ही एक टोळी आहे. असे विधान केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उघड पाठिंबा दिला जात नाही, अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

 

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले (Radhakrishna Vikhe-Patil), ‘खरं तर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही एक टोळी आहे. मविआ कुठल्याही विचारसरणीवर, विचारधारेवर किंवा तत्त्वावर एकत्र आलीच नव्हती. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, ही महाविकास आघाडीची अवस्था आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन निवडून आली. नंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले. त्यामुळे ते टिकले नाहीत.’ असा टोला यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

तर शिवसेना ठाकरे गटावर (Shivsena Thackeray Group) बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ‘अनेक मुद्यांवरून शिवसेनेची मागील २५ वर्षांपासून भाजपासोबत युती होती. आता शिवसेनेच्या ठाकरे सेनेनं हिंदुत्वापासून पूर्ण फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण विचारधारा नसलेली मंडळी जेव्हा एकत्र येते, मग सत्तेची समीकरणं कशी आहेत? कोण कशा पद्धतीने वागतो, याचा अधिक विचार होतो.’ अशी टीका यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, काल विखे-पाटील यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
तर यावर त्यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर देखील टीका केली आहे.
मामानेच पक्षाला मामू बनवलं! असा खोचक टोला यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

 

Web Title :- Radhakrishna Vikhe-Patil | radhakrushna vikhe patil on mahavikas aghadi gharoba with one and sansar with another

 

हे देखील वाचा :

Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा सीबीआय तपास पूर्ण; तपासाचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर

Navneet Rana | नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका!; कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

Pune Pimpri Crime News | तळेगावमध्ये कोयता गँगची दहशत, डोक्यात वार करुन तरुणाला लुटले

 

The post Radhakrishna Vikhe-Patil | ‘घरोबा एकाबरोबर करायचा अन् संसार दुसऱ्याबरोबर करायचा;’ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article