Header

Pune Crime News | चार्टर्ड अकाउंटंट यांना कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime News | चार्टर्ड अकाउंटंट यांना कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | पुण्यातील मुंकुंदनगर येथे राहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन तीस लाख रुपये खंडणी (Extortion) मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने (Pune Police Crime Branch Unit 2) अटक (Arrest) केली आहे. याबाबत (Pune Crime News) चार्टर्ड अकाउंटंट यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

किरण रामदास बिरादार Kiran Ramdas Biradar (वय-24 रा. उदगीर मांजरी, सध्या रा. पुणे स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा फिरस्ता असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले फोन, बनावट नोटा, रोख नोटा असा एकूण 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार यांना 5 जानेवारी रोजी व्हॉट्सअॅप चॅटींग करुन दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसचे खंडणीची रक्कम घेऊन पीएमसी बिल्डिंग (PMC Building) येथे बोलावले. पोलिसांनी पीएमसी येथे सापळा रचला. मात्र आरोपीला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तक्रारदार यांना पीएमसी येथे न येता गरवारे ब्रिज (Garware Bridge) खाली येण्याचा मेसेज केला. त्यानुसार पथकाने गरवारे ब्रिज परिसरात वेशांतर करुन सापळा रचला. आरोपीने पैशांची बॅग एका झुडपात ठेवण्यास सांगितले. आरोपीने बॅग घेतली असता दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी आरोपीला पळून जाताना अटक केली. आरोपी विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करुन स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Kranti Kumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite),
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी,
विजयकुमार पवार, मोहसिन शेख, संजय जाधव, प्रमोद कोकणे, उत्तम तारु, समीर पाटील,
कादिर शेख, गजानन सोनुने, निखिल जाधव, नवनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News | पुण्यात गुंडांचा उच्छाद सुरुच, येरवडा परिसरात टोळक्यांमध्ये राडा; बिअरच्या बाटल्या घरावर फेकत, कोयते हवेत फिरवून पसरवली दहशत

Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

 

The post Pune Crime News | चार्टर्ड अकाउंटंट यांना कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article