Pune Crime News | फेसबुक फ्रेंडने अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करुन केला अत्याचार; अल्पवयीन असल्यापासून सुरु होता प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | फेसबुक फ्रेंड (Facebook Friend) असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करुन तिचे अश्लिल व्हिडिओ बनविले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी कोरेगाव पार्कमधील एका २२ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी देबारशी नायक (रा. बसापूर, प्रगतीनगर, बेंगलोर) याच्यावर पोक्सो सह बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बेंगलोर, गुडगाव, जयपूर येथे २२ जून २०१४ ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नायक हा फिर्यादी यांचा फेसबुक फ्रेंड आहे.
त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन ओळख वाढविली. त्यानंतर तो फिर्यादीला वारंवार भेटू लागला. या दरम्यान त्याने फिर्यादी यांचे अश्लिल व्हिडिओ बनविले. ते व्हिडिओ फिर्यादींना दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. त्यानंतर तिला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच अश्लिल व्हिडिओ (Pornographic Video) दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडले गेले. सात वर्ष हा प्रकार सुरु होता. शेवटी कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे (API Sujata Shanme) तपास करीत आहेत.
Web Title : – Pune Crime News | Facebook friend blackmailed her by making obscene videos; It starts from childhood
हे देखील वाचा :
Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल
Pune PMC News | महापालिकेचा विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर खर्च लादतो
Pune Crime News | तब्बल 3 महिन्यांनी खूनाचा गुन्हा दाखल; भारती विद्यापीठ पोलिसांनी केली तिघांना अटक
The post Pune Crime News | फेसबुक फ्रेंडने अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करुन केला अत्याचार; अल्पवयीन असल्यापासून सुरु होता प्रकार appeared first on बहुजननामा.