Header

MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा

MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा

बहुजननामा ऑनलाईन – ‘बिग बॉस 16’ च्या विजयानंतर एमसी स्टॅन (MC Stan) हा खूपच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीने तर त्याने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉसच्या विजयानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याने एका मुलाखतीत बिग बॉसचा प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी (MC Stan) धक्कादायक विधान देखील केले आहे जे सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आज एमसी स्टॅनचे अनेक चाहते आहेत. एमसी स्टॅनने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील आजपर्यंतचा प्रवास उघडपणे सांगितला आहे. लहानपणापासून झालेली त्याची जडण घडण अनेक परिस्थितीत तो जगला यावेळी त्यांनी मिळवलेले शिक्षण आसपास घडणारी हिंसा, गुन्हेगारी विश्व याबद्दल देखील स्टॅनने मोकळेपणाने भाष्य केले आहे. तर यावेळी त्याने काही लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला होता याचाही खुलासा केला आहे.

 

 

यावेळी बोलताना स्टॅन (MC Stan) म्हणाला,” एकदा आम्ही आमच्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होतो आणि अचानक काही लोक तिथे आले आणि त्याला मारण्यास सुरुवात केली.
काहींनी त्याच्या मानेवर तलवारीने वार केला तर काहींनी त्याच्या डोक्यात वार केला.
हे सर्व काही आमच्या समोरच घडत होतं. अशा गोष्टी माझ्या बाबतीत देखील दोन ते तीन वेळा झाल्या आहेत.
पी-टाऊनमधील काही लोकांनी मला मारण्याची धमकी दिली आणि तशी त्यांची इच्छा देखील होती त्यांनी तसा
प्रयत्न देखील केला होता पण देवाच्या कृपेने मी दरवेळी यातून सुखरूप वाचलो”.
एमसी स्टॅनच्या या वक्तव्यानंतर त्याची ही मुलाखत सध्या खूपच चर्चेत आली आहे.
त्याच्या या बोलण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या या वायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- MC Stan | mc stan said some people tried to kill him

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’

Sanjay Jadhav | संजय जाधवचा ‘कलावती’ हा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; सिनेमात दिसणार तगडी स्टार कास्ट

Jalgaon Crime News | तिला आधी शितपेय पाजलं अन् नंतर…; नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

 

The post MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article